सायली

काल रात्री पाऊस पडला, छतावर नाचत राहिल्या त्यांच्या संगे तुझ्या आठवणी
आणि एक कळ उठली, वीज बघताना, मला पावसाचा वेड अन तुला माझं
हातात हात घालून पाहिलेले कित्येक पावसाळे पुन्हा चिंब भिजले
पुन्हा दरवळला तू घेऊन आलेल्या सायलीचा वास
मनभर हुंगलं अन परत रुमालात जपून ठेवलं, पुढचाही पाऊस येईलच कि,,
तू नसशील पण ह्या आठवणी आहेतच, रेशमी रुमालात घट्ट बांधलेल्या
सायलीची फुलंही पुन्हा सांडतीलच..
सांग सख्या रे..
रंगबेरंगी बागेतही हि साधी सायली आठवेल का रे?

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement