आठवण

खूप आठवण येते तुझी
अश्यावेळी खूप आठवण येते
कातरवेळी.. बेभान वाऱ्यात
गोंधळलेल्या  ढगात
एक अस्वस्थ हुरहूर असते
आणि तुझी खूप आठवण येते

का येते ह्या वेळेत हुरहूर आणि बेचैनी नुसती?
पक्ष्यांना घरट्याची आणि मला तुझी आस
उडून उडून पण मी उडणार तरी किती?
छोटा पडतो रे खुपदा श्वास..
आणि मग मी परत खाली उतरते
पण तुझी आठवण मात्र खूप येते..

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement